उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. राघवेंद्र स्वामी उडुपी मठाचे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या

१. ७ एप्रिल ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत ग्रहांची स्थिती आणि तिचा विविध देशांवरील संभाव्य परिणाम

१ अ. ग्रहांची स्थिती : अश्‍विनी नक्षत्रामध्ये रवि, चंद्र, गुरु आणि राहू, तसेच स्वाती नक्षत्रामध्ये केतू अन् भरणी नक्षत्रामध्ये बुध आहे.

१ आ. ग्रहांच्या वरील स्थितीचा परिणाम : त्यामुळे पुढील भागांमध्ये भूकंप, वेगवान वारे वहाणे, जोराची वादळे आणि विषारी विषाणूच्या (व्हायरसच्या) फैलावामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

१ इ. ग्रहांच्या स्थितीचा विपरीत परिणाम होणार्‍या ठिकाणांची नावे : इंडोनेशिया, फिलीपाईन्स, मलेशिया, थायलँड, सोलोमन आयर्लंड, न्यू पपुआ गिनिया (एका देशाचे नाव), कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, दक्षिण भारताचा समुद्रकिनारा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, हिंदी महासागराचा समुद्रकिनारा, बे ऑफ बंगाल, तसेच अटलांटिक ओशन, पॅसिफिक ओशन, वेस्ट आफ्रिका, ब्राझिल, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनिझुएला, गुयाना, सुरीनेम आणि पनामाच्या जवळील द्वीप.

१ ई. राशींवरील परिणाम : ग्रहांचा प्रभाव धनु आणि मिथुन या राशींवर होणार आहे. त्यामुळे आण्विक अस्त्राचा प्रयोग होऊ शकतो.

१ उ. आण्विक अस्त्राचा प्रयोग होणार असणे : रशियाने पॅसिफिक ओशन आणि अ‍ॅटलांटिक ओशन यांठिकाणी युद्धाची सिद्धता केली आहे. रशिया समुद्रात आण्विक अस्त्राचा प्रयोग करण्याची शक्यता आहे.

२. वर्ष २०२३ मधील पहिल्या आणि दुसर्‍या सूर्यग्रहणांचा विविध देशांवरील परिणाम

२ अ. पहिले सूर्यग्रहण : २० एप्रिल २०२३ या दिवशी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. ग्रहणाचे फळ पुढील सूर्यग्रहण, म्हणजे १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असेल.

२ अ १. सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम होणार्‍या ठिकाणांची नावे : हिंदी महासागर, दक्षिण अटलांटा सागर, पूर्व पॅसिफिक सागर, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाच्या जवळील द्वीप, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, बंगालची खाडी, थायलँड, कंबोडिया, ईशान्य भारत, दक्षिण चीन प्रांत.

२ अ २. सूर्यग्रहणाचा वरील ठिकाणी होणारे विपरीत परिणाम

अ. वरील ठिकाणी तीव्र, विशाल आणि रौद्र रूपातील चक्रीवादळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला पुष्कळ त्रास सहन करावा लागेल.

आ. समुद्राच्या उंच लाटांमुळे भूमीला भेगा पडतील आणि डोंगर खाली कोसळतील यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

इ. वातरोगाची बाधा वाढू शकते.

ई. अणूबाँबचा वापर होण्याची शक्यता आहे.

२ आ. दुसरे सूर्यग्रहण : १४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी दुसरे सूर्यग्रहण आहे.

२ आ १. दुसर्‍या सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम होणारे प्रदेश : पुढील प्रदेशांची हानी होणार आहे, केरेबियन द्विपसमूह, पूर्व अटलांटिक सागर, सेंट मार्टिन, दक्षिण पॅसिफिक आणि त्याच्या जवळील सेंट बर्तलेमी आइसलँड, मॅक्सिको, ब्राझिल आणि व्हेनिझुएला.

– ज्योतिषी श्री. जयतीर्थ, उडुपी, कर्नाटक. (७.४.२०२३)