नवी देहली – अफगाणिस्तानमधील हिंदुकुश भागात २१ मार्चच्या सायंकाळी ६.५ रिश्तर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के पाकिस्तान आणि भारतातील देहलीसह काही शहरांमध्ये जाणवले. अफगाणिस्तानमध्ये १०, तर पाकिस्तानमध्ये ९ जणांना मृत्यू झाला. यासह १६० जण घायाळ झाले. अफगाणिस्तानमध्ये भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी यापूर्वीच एका डच संशोधकाने केली होती.
अफगानिस्तान में आए भूकंप के झटके पूरे उत्तर भारत में महसूस किए गए. यूएस जियोलॉजिकल सर्वे ने भूकंप की तीव्रता 6.5 मापी. #Delhi #DelhiNCR #Afghanistan #Earthquake #Paksitanhttps://t.co/dFG4vAybid
— ABP News (@ABPNews) March 22, 2023
फेब्रुवारी मासामध्ये तुर्किये आणि सीरिया देशांमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता, ज्यामध्ये ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपानंतर डच संशोधक फ्रँक हॉगरबीट्स यांनी भाकीत वर्तवले होते की, तुर्कियेनंतर पुढील भूकंप अफगाणिस्तानापासून चालू होईल आणि अखेरीस पाकिस्तान आणि भारत येथून पुढे जाऊन हिंदी महासागरात संपेल. हा ढोबळमानाने अंदाज आहे.