राज्यात अतीवृष्टीमुळे १२६ जणांचा मृत्यू !

या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील ४४ घरांचे पूर्णत:, तर ३ सहस्र ५३४ घरांची अंशत: हानी झाली आहे. अतीवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील १२६ नागरिकांनी स्वत:चे प्राण गमावले आहेत. १ जूनपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्हे आणि ३५२ गावे प्रभावित झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा

जगातील सर्वांत प्राचीन नद्यांपैकी एक ३४६ कि.मी. लांबीच्या थेम्स नदीचा किनारा कोरडाठक्क पडण्याच्या मार्गावर !

ब्रिटनने त्यांच्या देशातील १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. त्यात डेवोन, कॉर्नवाल, सॉलेंट, साऊथ टाऊ, केंट, दक्षिण लंडन, हर्ट्स, उत्तर लंडन, ईस्ट एंग्लिया, थेम्स, लिंकनशायर, नॉर्थम्प्टनशायर आणि मिडलँड्स या भागांचा समावेश आहे.

शेष पृथ्वीच्या तुलनेत ४ पटींनी गरम होत आहे आर्क्टिक क्षेत्र ! – संशोधन

मानवाच्या अनियंत्रित आणि अविचारीपणे केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचाच हा दुष्परिणाम !

युरोपात दुष्काळामुळे हाहा:कार !

नैसर्गिक संकटाची तीव्रता ! स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले. या देशांत जुलै मासात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान नोंदवले गेले. स्पेनमध्ये उष्णतेने तर ६० वर्षांचा विक्रम मोडला !

पावसाच्या उघडीपीमुळे थोडा दिलासा; पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीजवळ !

अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू !

या वर्षी १ जून ते २३ जुलै या पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवलेल्या पूर, वादळ, भूस्खलन, वीज कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे

अतीवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ घोषित करावा ! – अजित पवार

पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे अद्यापही होऊ शकलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. १०० हून अधिक व्यक्तींचा अतीवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे.