गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?

मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !

याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

द्रविडविरोधी विचारसरणीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला पोलीस अनुमती नाकारू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला एकाच विचारसरणीचे पालन करण्यास भाग पाडणे शक्य नाही आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या विचारधारेविषयी तिचे मते मांडण्याचा नेहमीच अधिकार असतो.

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

प्रयागराज येथील शिवमंदिरातून शिवलिंगाचीच चोरी !  

पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मुदत संपल्यानंतर उपकरणे भंगरात काढावी लागणार !

केंद्रशासनाने घरगुती वापराच्या उपकरणांची निश्‍चित केली मुदत !
धुलाई यंत्र, शीतकपाट, लॅपटॉप, भ्रमणभाष, संगणक, दूरचित्रवाणी संच आदींचा समावेश !

बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !  

या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्‍यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

. . . अन्यथा हिंदु रक्षा महाआघाडीला मुक्त गोमंतकातील चर्चच्या हिंदुविरोधी आणि पोर्तुगीज चमचेगिरीच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडून रस्त्यावर यावे लागेल, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

ख्रिस्ती धर्मगुरूंनी अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नयेत ! – गोव्याचे आर्चबिशप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिल्यानंतर २४ घंट्यांच्या आत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून अशा घटनांविषयी चर्चची भूमिका स्पष्ट केली आहे.