कानपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी कार्यालयातील धारिका (फाईल्स) स्वच्छता कर्मचार्‍यांनी रद्दीत विकल्या !

स्वच्छता कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असतांना वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षारक्षक झोपले होते का ?

उत्तराखंडच्या नैनितालची भूमीही खचू लागल्याने २५० घरे केली जात आहेत रिकामी !

उत्तराखंडच्या जोशी मठ भागामध्ये भूस्खलनामुळे घरांना भेगा पडत असल्याने तेथील लोकांना स्थलांतरित करण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील नैनिताल येथील भूमीही खचत असल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकमध्ये गोमांस घेऊन जाणार्‍या चारचाकी वाहनाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावली आग !

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्‍या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?

सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.

मागील साडेचार वर्षांत गोव्यातील साडेसहा सहस्र युवक मद्य किंवा अमली पदार्थ व्यसनांच्या आहारी !

सनबर्नसारख्या कार्यक्रमांत अमली पदार्थ, मद्य यांचा सर्रास होत असलेला वापर या स्थितीला उत्तरदायी आहे ! युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी सर्वांना साधना शिकवणे आवश्यक आहे !

पसार १९ खलिस्‍तानी आतंकवाद्यांची संपत्ती होणार जप्‍त !

या खलिस्‍तानी आतंकवाद्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्‍तानसह इतर देशांमध्‍ये आश्रय घेतला आहे. आता या सर्व पसार आतंकवाद्यांची संपत्ती अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्‍या कलम ३३ (५) अंतर्गत जप्‍त करण्‍यात येणार आहे.

देशात ९ नवीन ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’ गाड्यांना प्रारंभ

या रेल्‍वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्‍थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्‍यांमध्‍ये धावणार आहेत.

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची ! – प.पू. मोहन भागवत, सरसंघचालक

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच १० लाखांहून अधिक मतदार आढळले मयत !

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे.