पुणे – पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’ (एम्.सी.सी.सी.आय.) पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित ‘भारतीय अर्थविषय धोरणांविषयीचे तत्त्वज्ञान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ३०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते.
सौजन्य प्रेरणा मीडिया
प.पू. भागवत म्हणाले की, ‘‘उद्योगजगाने व्यापक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करावा. समाजाच्या भरभराटीतच वैयक्तिक भरभराट दडलेली असते. भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्त्वज्ञान अन्य देशांपेक्षा वेगळे आहे. औद्योगिकीकरण, शाश्वत ऊर्जेचा उपयोग आणि उद्योगात मानवी दृष्टिकोन ठेवावा. उद्योगपतींनी आपण उद्योगाचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत, हा विचार कायम मनात ठेवावा.’’