कोरोना लस आणल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस निर्माती आस्थापने यांचे सभागृहाकडून अभिनंदन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.

काठ्या आणि झेंडे घेऊन या ! – व्हिडिओद्वारे शेतकर्‍यांना चिथावणी

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत टिकैत यांच्यासहित सर्व शेतकरी नेत्यांना कारारगृहात टाकणे अपेक्षित होते ! तसे न होणे, ही देहली पोलिसांची निष्क्रीयताच म्हणावी लागेल !

देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

दीप सिद्धू याच्याशी माझे संबंध नाहीत ! – भाजपचे खासदार सनी देओल यांचे स्पष्टीकरण

मी अगोदरही ६ डिसेंबर या दिवशी ट्वीट करून हे स्पष्ट केले आहे की, माझा किंवा माझ्या कुटुंबियांचा दीप सिद्धू याच्याशी कोणताही संबंध नाही, असे ट्वीट भाजपचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी केले आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक घायाळ

आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !

लैंगिक अत्याचाराविषयीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय स्थगित करते किंवा पालटते, यावरून जनतेने काय समजायचे ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.

३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा

येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे.

शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचा भारतमाता की जय संघटनेकडून निषेध !

राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्‍यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्‍यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.

भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो.