काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक घायाळ

आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील शम्सीपोरा येथे आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या ‘रोड ओपनिंग पार्टी’वर (अती महनीय व्यक्ती संवेदनशील परिसरातून प्रवास करत असतांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांच्या ताफ्यावर) ग्रेनेडद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ४ सैनिक घायाळ झाले.

घायाळ सैनिकांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या आक्रमणानंतर सैन्याने या परिसराला वेढा घातला असून आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.