तिरुपती बालाजी मंदिरातील भाविकांच्या अर्पण केलेल्या केसांची चीनमध्ये तस्करी

अशा प्रकारची तस्करी हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळामधून होते, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! उद्या अशा कुचकामी सुरक्षायंत्रणेमुळे आतंकवादी आक्रमण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

केरळ ब्राह्मण सभेने निषेध केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ या लघुचित्रपटाचे नाव पालटले !

केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.

देवस्थानाचा कारभार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक निर्णयाविषयीची माहिती देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाला द्या !  – धर्मादाय विभागाच्या उपायुक्तांचा आदेश

आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’

गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात ! – सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री

गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले.

विदिशा (मध्यप्रदेश) येथे धर्मांध वन माफियांकडून त्यांची तक्रार करणार्‍या हिंदूची ट्रक्टरखाली चिरडून हत्या !

भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून राज्यातील सर्वच वन माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !

आज मोरजी येथे ‘गोवा कुंभ’ पर्वाचा शुभारंभ

‘सत्गुरु फाऊंडेशन’ तथा ‘सद्गुरु युथ फेडरेशन’ यांच्या वतीने ‘ॐ नमो नारायणाय’ कार्यक्रमाचे आयोजन

केरळमध्ये भाजपचा उमदेवार आक्रमणात घायाळ

हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली होती ! 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गृहमंत्र्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारच्या खंडणीचा केला आरोप ! आरोप गंभीर असल्याने त्याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयी जनतेला वस्तूस्थिती सांगणे आवश्यक !

कोल्लूरू मुकांबिका मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या अपव्यवहाराच्या अन्वेषणामध्ये मंदिर महासंघालाही सहभागी करून घ्यावे ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

दत्तात्रेय होसबळे रा.स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड झाली.