आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमकडून गृहमंत्रालयाकडे तक्रार

योगऋषी बाबा रामदेव यांच्या विरोधात थयथयाट करणारी आय.एम्.ए. ख्रिस्ती धर्मप्रसारकाप्रमाणे वागणारे डॉ. जयलाल यांच्याविषयी गप्प का ? अध्यक्षपदावरून त्यांनी केलेली कृत्ये आय.एम्.ए.ला मान्य आहेत का ?

डावीकडून डॉ. जयलाल

नवी देहली – इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमने (एल्.आर्.पी.एफ्.ने – कायदेशीर अधिकार संरक्षण गटाने) केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या फोरमने ‘डॉ. जयलाल यांनी अधिकारांचा अपवापर केला, तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी या काळात रुग्णांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर  कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

१. एल्.आर्.पी.एफ्.ने तक्रारीत डॉ. जयलाल यांचा वैद्यकीय परवाना रहित करण्याची मागणी करत आरोप केला की, वादग्रस्त असलेले डॉ. जयलाल यांनी समाजाला ख्रिस्ती आणि बिगर-ख्रिस्ती असे विभाजित करण्याचा आणि उपलब्ध संधींचा वापर करून बिगर ख्रिस्त्यांचे धर्मांतर करण्याचा त्यांचा हेतू उघडपणे जाहीर केला आहे. ‘डॉ. जयलाल यांना अध्यक्षपदावरून काढून टाकले जात नाही तोपर्यंत आय.एम्.ए.ला मिळणारे सर्व निधी थांबवायला हवेत’, अशीही मागणी करण्यात आली आहे.

३. आय.एम्.ए.चे अध्यक्ष ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या पदाचा वापर करत असल्याचा आरोप एल्.आर्.पी.एफ्.ने केला आहे. कोरोना महामारीचा नैसर्गिक आपत्ती म्हणून उपचार करण्याऐवजी डॉ. जयलाल आणि त्यांचा धर्मप्रचारक चमू अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करण्यात गुंतला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. ही वृत्ती म्हणजे मृत्यू आणि विध्वंस या काळात गिधाडाप्रमाणे माणसाचे लचके तोडण्याचा प्रकार आहे, असेही यात म्हटले आहे.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रवादी सरकार’ आधुनिक औषधाच्या विरोधात ! – डॉ. जयलाल

एल्.आर्.पी.एफ्.ने जयलाल यांनी दिलेल्या २ मुलाखतींकडे लक्ष वेधले आहे ज्यात त्यांनी हिंदूंचे धर्मांतर करण्याविषयी मत व्यक्त केले होते. डॉ. जयलाल ‘हग्गा इंटरनॅशनल’मधील मुलाखतीत म्हणतात की, हिंदु राष्ट्रवादी सरकार आधुनिक औषध यंत्रणा नष्ट करू इच्छित आहे. सरकारला औषधाची एक प्रणाली बनवायची आहे. पुढे त्यांना पूर्ण देशात एक धर्म बनवायचा आहे, जो संस्कृत भाषेवर आधारित असेल. (संस्कृतविषयी डॉ. जयलाल यांना एवढा द्वेष का ? डॉ. जयलाल यांची विचारसरणी किती हिंदु विरोधी आहे, हे यातून दिसून येते ! – संपादक)

(म्हणे) ‘ सरकार नव्हे, तर चर्चच लोकांची काळजी घेत आहे !’ – डॉ. जयलाल

‘ख्रिश्‍चन टुडे’ला दिलेल्या दुसर्‍या मुलाखतीत डॉ. जयलाल यांनी म्हटले होते की, चर्चनेच गरिबांची काळजी घेतली; मात्र सरकारने काहीही केले नाही. पुढे जयलाल यांचा असा दावा आहे की, ते आयुर्वेदीय औषधांच्या वापराच्या विरोधात उपोषण, निषेध आयोजित करत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातही कायदेशीर लढा देत आहेत.

धर्मांतराच्या उपक्रमांना चालना देतांना जयलाल म्हणाले होते की, ख्रिस्ती डॉक्टरांनी ‘शारीरिक’ आणि ‘अध्यात्मिक’ या दोन्ही उपचारांमध्ये गुंतले पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष संस्था, मिशन संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे अधिकाधिक ख्रिस्ती डॉक्टरांनी काम करावे.
जयलाल यांच्या म्हणण्यानुसार भारत देश अनेक देवतांवर विश्‍वास ठेवणारा समाज आहे; म्हणून हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे आहे. हिंदु धर्म किंवा हिंदुत्व यामुळेच इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे. ते भिन्न देवता स्वीकारतात. भारतात इतर देशांच्या तुलनेत धार्मिक निर्बंध अल्प आहेत. मला वाटते की, त्यामुळे भारतात धर्मांतर करणे सोपे आहे.