अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन !

अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार; ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला.  एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे.

केरळमध्ये माकपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याकडून ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?

 न्यायालयातील चेंबरचा वापर धर्मांतरासाठी करणार्‍या धर्मांध अधिवक्त्याचा परवाना देहली बार कौन्सिलकडून तात्पुरता रहित !

न्यायालयाच्या आवारातील चेंबरचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी काँग्रेसचा नेता असलेल्या एका अधिवक्त्याने त्याच्या चेंबरमध्ये महिला अधिवक्त्याचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले होते.

एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतलेले फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावरून काँग्रेसने केले केंद्रशासनाला लक्ष्य !

काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?

देहली येथे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी. रंगराजन कुमारमंगलम् यांच्या पत्नीची चोरीच्या उद्देशाने हत्या

देशाच्या राजधानीमध्ये अशा प्रकारच्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ; गावठी बॉम्बचाही वापर !

पोलिसांकडून तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, तर या प्रकरणी पोलिसांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र या घटनेसाठी धर्मांधांकडून कायदा हातात घेणे कदापि स्वीकारता येणार नाही !

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

उत्तरप्रदेश राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही तेथे गोहत्या होते आणि गोमांसाची तस्करी होते, हे पोलिसांना लज्जास्पद !

आय.एस्.आय.ला गोपनीय कागदपत्रे पुरवणार्‍या भारतीय सैन्याच्या दोघा सैनिकांना अटक

गोपनीय माहिती पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला पुरवल्याच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी सैन्यातील हरप्रीत सिंह (वय २३ वर्षे) आणि गुरभेज सिंह (वय २३ वर्षे) या दोघा सैनिकांना अटक केली आहे.