अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा द्या !
नवी देहली – भारतीय सैन्याची महत्त्वाची गोपनीय माहिती पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला पुरवल्याच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी सैन्यातील हरप्रीत सिंह (वय २३ वर्षे) आणि गुरभेज सिंह (वय २३ वर्षे) या दोघा सैनिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सैन्याची कार्यपद्धत आणि तैनाती यांविषयीची काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांनी सुमारे ९०० कागदपत्रे पाकिस्तानातील अमली पदार्थांचा तस्कर रणवीर सिंह याला गेल्या ४ मासांमध्ये पुरवली. ही कागदपत्रे पुढे आय.एस्.आय.ला पुरवल्याची माहिती पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी दिली.
Two Army jawans arrested for allegedly spying for Pakistan’s Inter-Services Intelligence; shared photos of over 900 classified documents with a cross-border drug smuggler who passed them on to Pakistani intelligence officers: Punjab Police
— The Times Of India (@timesofindia) July 6, 2021