केरळमध्ये माकपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याकडून ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

गेल्या ३ वर्षांपासून करत होता लैंगिक अत्याचार !

  • अशा अमानुष कृत्याच्या प्रकरणी आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत ! केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असल्याने या कार्यकर्त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन महिला संघटनांनी सतर्क राहिले पाहिजे !
  • माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?
डावीकडून आरोपी अर्जुन

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील इडुकी जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा शाखेचा २२ वर्षीय कार्यकर्ता अर्जुन याला ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही मुलगी ३ वर्षांची असल्यापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. अर्जुन या मुलीचे पालक घरी नसतांना तिच्या घरी जात असे. तिला टॉफी किंवा अन्य वस्तूंचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता.

३० जून या दिवशी बलात्कारानंतर ही मुलगी बेशुद्ध झाल्यावर अर्जुन याला ती मेल्याची भीती वाटल्याने त्याने तिला गळफास लावून लटकवले. त्यात तिचा मृत्यू झाला. मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अर्जुन याचे नाव पुढे आले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा स्वीकारला.

माकपच्या दोघा नेत्यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक

गेल्या आठवड्यातच माकपचे नेते पी.पी. बाबूराज आणि टी.पी. लिजेश यांच्यावर पक्षाच्या महिला कार्यकर्तीचे लैंगिक शोषण आणि तिला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. (‘माकपमध्ये वासनांधांचा भरणा आहे का ?’ असा प्रश्‍न कुणाच्या मनात आल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)