उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

पोलिसांच्या गोळीबारात एक तस्कर घायाळ !

  • उत्तरप्रदेश राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही तेथे गोहत्या होते आणि गोमांसाची तस्करी होते, हे पोलिसांना लज्जास्पद !
  • पोलिसांवर गोळीबार करणार्‍या तस्करांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत !
प्रतिकात्मक छायाचित्र

उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथील लक्ष्मणपुरी-बांगरमऊ मार्गावरील मुरव्वतपूर तिठ्यावर गोवंशाची हत्या करून गोमांसाचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाल्यावर रात्री ३ च्या सुमारास पोलीस तेथे पोचले असता त्यांच्यावर गोतस्करांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात मजिद नावाचा तस्कर घायाळ झाला, तर अन्य ४ पसार झाले. मजिदकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला. पोलिसांनी नंतर मजिदच्या घरातून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले.