अपत्ये ही ‘अल्लाहची देन’ असतील, तर त्यांच्यासाठी सोयीसुविधा आणि विशेष आरक्षण सरकारकडे का मागता ? 

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्‍न केला आहे, ‘मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर अल्लाहची इच्छा आहे, तर धर्माच्या आधारावर सोयीसुविधा, अल्पसंख्यांक आयोग आणि अन्य आरक्षण सरकारकडे का मागता ?

चाय पे चर्चा !

केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा करा, न थकता काम करा !

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.

अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन !

अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार; ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला.  एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे.

फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते.

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्‍चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !
देहलीतच होणार नियुक्ती !

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याकडून इरफानला शाबासकी देऊन कौतुक केल्याची माहिती समोर ! 

उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर ‘रॅकेट’ प्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (तालुका परळी) गावचा इरफान ख्वाजा खान याला २९ जून या दिवशी उत्तरप्रदेशातील आतंकवादविरोधी पथकाने देहलीत अटक केली.

सातारा येथील खेळाडू प्रवीण जाधव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे कौतुक !

ऑलंपिकमध्ये यशस्वी घोडदौड करण्यासाठी मोदी यांनी प्रवीण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.