सातारा येथील खेळाडू प्रवीण जाधव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे कौतुक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे प्रवीण जाधव यांचे कौतुक केले

सातारा, २८ जून (वार्ता.) – जपानमधील टोकीयो येथे होणार्‍या ऑलंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी फलटण तालुक्यातील सारोळे या गावच्या प्रवीण जाधव यांची निवड झाली आहे. प्रवीण जाधव हे धनुर्विद्या (आर्चरी) या खेळामध्ये निष्णात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे प्रवीण जाधव यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘जपान येथील टोकीयोमध्ये होणार्‍या ऑलंपिकसाठी जाणार्‍या प्रत्येक खेळाडूने संघर्षमय जीवन व्यतीत केलेले आहे. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यासाठी त्यांना खुल्या मनाने पाठिंबा देणे आवश्यक आहे. ऑलंपिकमध्ये यशस्वी घोडदौड करण्यासाठी मोदी यांनी प्रवीण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.’’