खासदार शफीकुर्रहमान यांना हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न !

मुंबई – उत्तरप्रदेशमधील प्रस्तावित ‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ला विरोध करतांना समाजवादी पक्षाचे संभल येथील खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी ‘मूल जन्माला घालणे, ही अल्लाहची देन असून नैसर्गिक गोष्टींना विरोध करणे, योग्य नाही’, असे विधान केले होते. या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्न केला आहे, ‘मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर अल्लाहची इच्छा आहे, तर धर्माच्या आधारावर सोयीसुविधा, अल्पसंख्यांक आयोग आणि अन्य आरक्षण सरकारकडे का मागता ? हिंदु जनजागृती समिती शफीकुर्रहमान यांच्या वक्तव्याचा निषेध करते’, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन !
श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, उत्तरप्रदेश शासनाने ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ आणण्याचा निर्णय घेऊन सर्व राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. याचे हिंदु जनजागृती समिती मनापासून स्वागत करते. या देशात धर्माच्या नावावर अल्पसंख्यांकांना एक न्याय आणि बहुसंख्यांक हिंदूंना वेगळा न्याय, हे चालणार नाही. सर्व नियम आणि कायदे भारतभरात समान असायला हवेत. लोकसंख्येचे धार्मिक संतुलन राखायचे असेल, तर ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करणे, ही काळाची आवश्यकता आहे. लोकसंख्यावाढ ही एक राष्ट्रीय समस्या असून केंद्रशासनाने कठोर राष्ट्रीय ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ केला पाहिजे, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहोत.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !