सुवर्ण मंदिराजवळ तंबाखू आणि मद्य यांचे सेवन करणार्याची निहंग शिखांकडून हत्या
प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून १ किमी अंतरावर निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली. या व्यक्तीने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केल्यामुळे ही हत्या करण्यात आली. हरमनजीत सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.