दुमका (झारखंड) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या हिंदु मुलीची आरोपी मुसलमान तरुणाकडून हत्या

हत्या करून मृतदेह झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न

दुमका (झारखंड) – काही दिवसांपूर्वी येथे शाहरूख नावाच्या तरुणाने अंकिता नावाच्या मुलीला पेट्रोल ओतून जाळून मारल्याची घटना घडली होती. आता श्रीअमडा गावात अरमान अन्सारी याने बलात्कार केलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि ‘ती आत्महत्या वाटावी’ म्हणून झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत तिला लटकवले. अन्सारी या मुलीवर अनेक दिवसांपासून बलात्कार करत होता. ही मुलगी आदिवासी समाजातील होती. शवविच्छेदन केल्यानंतर या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आणि ती गर्भवती असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अरमान याला अटक केली आहे.

ही मुलगी मजुरीचे काम करते. १४ वर्षांच्या असणार्‍या मुलीला कामावर जात असतांना अरमान याने पकडले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सतत काही दिवस त्याने तिच्यावर बलात्कार केला.

संपादकीय भूमिका 

अशा वासनाधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्याला दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !