पुन्हा एकदा बांगलादेशी…!

अंकिता सिंह नावाच्या मुलीला लव्ह जिहादमध्ये फसवून तिला पेट्रोल ओतून जिवंत जाळून ठार मारणारा शाहरुख

झारखंड येथील अंकिता सिंह नावाच्या मुलीला लव्ह जिहादमध्ये फसवून तिला पेट्रोल ओतून जिवंत जाळून ठार मारणारा शाहरुख आणि त्याचा मित्र नईम यांच्या संदर्भात आता पोलिसांच्या अन्वेषणातून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. या दोघांनी यापूर्वीही हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहेत. या हत्यारांचे बांगलादेशशी संबंध उजेडात आले आहेत. अंकिताच्या हत्येमध्ये शाहरुख याला साहाय्य करणारा नईम अन्सारी हा बांगलादेश येथील जिहादी कारवाया करणारी आणि बंदी घालण्यात आलेली संघटना अन्सार-उल-बांगलाच्या प्रभावाखाली होता. नईम याच्या भ्रमणभाषमधून अन्सार-उल-बांगला या संघटनेचे अनेक व्हिडिओज सापडले आहेत. या व्हिडिओजमध्ये या संघटनेकडून हिंदु मुलींना कशा प्रकारे फसवायचे ? त्यांच्याशी निकाह करून त्यांचे इस्लाममध्ये कसे धर्मांतर करायचे ? हे सांगण्यात आले होते. या माहितीमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. अंकिता हिने शाहरुख यास नकार दिल्यावर तिला ठार मारण्याचा सल्ला नईम यानेच दिला होता, असे समजते. त्यावरून दोघांनी अंकिता झोपलेली असतांना तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळले. शाहरुख याने अत्यंत क्रूरतेने अंकिताला ठार मारले आणि नंतर अटक केल्यावर प्रसारमाध्यमांना हसत सामोरा गेला, त्यामुळे देशवासियांमध्ये अत्यंत संतापाची भावना निर्माण झाली आहे. सर्वांनी त्याला सार्वजनिकरित्या फाशी देण्याचीच मागणी केली आहे. अंकिता यांना जिवंत जाळून मारणारे बांगलादेशमधील जिहादी संघटनेच्या प्रभावाखाली होते, या माहितीमुळे देशवासियांच्या संतापात आणखी भर पडणार हे निश्चित !

हिंदूंविरुद्ध जिहाद !

बांगलादेशी धर्मांधांचा प्रभाव बांगलादेशात प्रचंड प्रमाणात दिसून येतो. तेथील आतंकवादी संघटना आणि धर्मांध हिंदूंना ठार मारतात, हिंदु स्त्रियांवर बलात्कार करतात अन् घरे जाळून हिंदूंना उद्ध्वस्त करतात. तर बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेले बांगलादेशी मुसलमान हे दुसरे घुसखोर रोहिंग्या यांच्यासमवेत भारतात विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत, याची माहिती पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर उघडकीस येत आहे. बहुतांश बांगलादेशी घुसखोर भारतात बलात्कार, हत्या, घरफोडी, चोर्‍या या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. भारतातील धर्मांध हे ‘अल्पसंख्यांक’ म्हणवून घेऊन देशांतर्गत गुन्ह्यांमध्ये मात्र ‘बहुसंख्य’ आहेत, असे लक्षात येते. त्यात त्यांना बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची साथ आहे, यातून भारतात हिंदूंच्या विरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण किती वाढले असेल ? याची कल्पना करता येईल.

बांगलादेशींना भारतात पारपत्र (व्हिसा), शिधापत्रिका, आधारकार्ड अशी भारतीय नागरिकाची सर्व कागदपत्रे सहजतेने मिळतात. त्यांचे ‘एजंट’ येथे कार्यरत असतात. हे ‘एजंट’ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेश येथून भारतात घुसखोरी करून त्यांना येथे वसवण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करतात. त्यासाठी त्यांना भारतातील ‘स्लीपर सेल’ (बांगलादेशींना देशात अवैधपणे वसवण्यात साहाय्य करणारे स्थानिक धर्मांध) साहाय्य करतात. त्यांच्याविना भारतात या बांगलादेशींना वसवणे अशक्यच आहे.

बांगलादेशी घुसखोरांना हाकला !

गोव्यातही नुकतेच एका बांगलादेशी जोडप्याला पोलिसांनी पकडले आहे. हे जोडपे अनधिकृतपणे ४ वर्षे गोव्यात, तर ११ वर्षे देहलीसह देशातील विविध भागांमध्ये वास्तव्य करत होते. त्यापूर्वी आणखी एका नागरिकाला पोलिसांनी पकडले आहे. बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यांची हस्तांतरणाची सर्व कागदपत्रे सिद्ध होईपर्यंत या नागरिकांना ते स्वत: वास्तव्य करत असलेल्या घरातच थांबण्यास सांगण्यात येते. त्यांची कागदपत्रे सिद्ध झाल्यावर आणि बांगलादेशी सरकारची अनुमती मिळाल्यावर प्रत्यक्ष हस्तांतरण होते. या कालावधीत संबंधित नागरिक घरातून पळून गेल्यास पुन्हा त्याला शोधण्यासाठी पोलीस बळ वाया जाते.

दुसरीकडे आसाम येथे तेथील मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनी काही दिवसांपूर्वीच तेथील बांगलादेशी घुसखोर रहात असलेल्या ३०० एकर भूमीवरील अतिक्रमणे हटवली. हिंमत बिस्व सरमा हे आसाममध्ये घुसलेल्या बांगलादेशींविरुद्ध प्रभावीपणे कार्यवाही करत आहेत.

बांगलादेशाची सीमा भारतातील ५ राज्यांना लागून आहे. त्यामुळे या सर्व राज्यांमधील धर्मांध अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून सहजपणे भारतात प्रवेश करतात. सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या काही व्हिडिओजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बांगलादेशी घुसखोर अक्षरश: भारत आणि बांगलादेश सीमेवरील तारेच्या कुंपणांवरून उडी मारून भारतात प्रवेश करत आहेत. बांगलादेशी हे भारतातील गायी आणि अन्य गुरे यांना सीमेवरील तारेच्या कुंपणावरून ढकलून त्यांची बांगलादेशात तस्करी करत आहेत.

बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना पकडून भारताबाहेर पाठवण्याचे प्रमाण नगण्य आहे. मुंबईतील आझाद मैदान येथील दंगलीनंतर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी सापडलेले दंगलखोराचे पारपत्र एका बांगलादेशी नागरिकाचेच होते. भारतातील हिंदूंवरील आक्रमणे, अत्याचार, दंगली यांमध्ये बांगलादेशींचा सहभाग वाढता आहे. बांगलादेशातील धर्मांधांनी तेथील हिंदूंचे जीवन नरकासमान केले आहे. आता भारतातील त्यांचे हस्तक येथील हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ही विषवल्ली शासनकर्त्यांनी वेळीच ठेचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !

भारतीय स्त्रियांविरुद्ध धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी तात्काळ आणि कठोर शिक्षेची व्यवस्था हवी !