परभणी येथील मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या !

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्या काही सहकार्‍यांनी जीवघेणे आक्रमण केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शहर कार्यालयात त्यांच्यावर आक्रमण झाले. सचिन पाटील हे त्यांच्या सहकार्‍यांसह शहरातील कार्यालयात बोलत बसलेले असतांनाच त्यांचा काही सहकार्‍यांसमवेत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने तेथे हाणामारी झाली. या वेळी मनसेच्या एका पदाधिकार्‍याने पाटील यांच्यावर चाकूने आक्रमण केले.  (आपल्याच पक्षाच्या प्रमुखाला मारणारे कार्यकर्ते !  – संपादक)