परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय
‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय
मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.
रियाझ काझी हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आहेत.
वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच राज्याची कोरोनाविषयक स्थिती यांविषयी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे.
या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ पोलीस अधिकार्याने गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान यांचे धिंडवडे निघाले आहेत.
या प्रकरणात १४ सीमकार्ड वापरण्यात आली असल्याचे आतंकवादविरोधी पथकातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.