मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.

कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांची १६ मार्चला मुंबईत बैठक

विधानसभेच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १६ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित केली आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून अटक

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ वाहन उभे करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एन्.आय.ए.ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबईमधील कुठलीही ‘केस’ सचिन वाझे यांच्याकडे जाईल, असा प्रकार चालू होता ! – देवेंद्र फडणवीस

‘क्राईम इंटेलिजन्स युनिट’ या मुंबई पोलिसांतील महत्त्वाच्या युनिटचा प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो; मात्र रातोरात त्या पदावरील व्यक्तीचे स्थानांतर करून साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जा असलेले सचिन वाझे यांच्याकडे हे पद देण्यात आले.

आजचा दिनविशेष : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन

… अन्यथा उत्तरदायी अधिकार्‍यांपैकी कुणालाही सोडणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालयाची अन्वेषण यंत्रणांना चेतावणी

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आणखी किती काळ तुमचे अन्वेषण चालू रहाणार ? कर्नाटक राज्यात यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्येचे खटलेही चालू झाले. आपल्या राज्यात अद्याप खटले का चालू झाले नाहीत ?

मराठी भवन मरीन ड्राईव्ह (मुंबई) येथे उभारणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मरीन ड्राईव्ह येथील जवाहरलाल बालभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा नोंद

वसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम असतांनाच राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलिसांनाकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात् मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले.

यंदा मुंबईसह कोकणात तीव्र उन्हाळा ! – हवामान खाते

राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.

मुंबईतील एका उपाहारगृहातील १० कर्मचारी कोरोनाबाधित 

गेल्या मासापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.