मुंबईत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. २ किलो २०० ग्रॅम वजनाचे हे अमली पदार्थ आहेत.

ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईत कामावरून घरी परतणार्‍या नागरिकांचा खोळंबा

घरी परतणार्‍या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर ताटकळत उभे रहावे लागले, तर रस्ते वाहतुकीने घरी जाणारे नागरिक वाहतूककोंडीमुळे ५-६ घंटे रस्त्यांवर अडकून पडले.

मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प, तर सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल !

पहिल्याच पावसामुळे मुंबईची झाली दूरवस्था ! रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकांवर कर्मचार्‍यांचा खोळंबा, शीव रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप !

नेमेचि येतो…!

जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्‍या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे.

उत्पादन शुल्कामध्ये वाढ करून केंद्र सरकारने ग्राहकांची लूट केली ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

देशात इंधनाच्या दरात सतत वाढ चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ‘ट्वीट’द्वारे केला आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधानांची भेट घेणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे

अभिनेत्याच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत !

अभिनेता पर्ल व्ही. पुरी हे एकता कपूर यांच्या ‘नागीण’ या मालिकेत काम करत आहेत. पोलिसांनी बलात्कारप्रकरणी त्यांना अटक केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राज्यात १ सहस्र ठिकाणी आंदोलन करणार ! – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल यांमधून कररूपाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

लसीकरण करणार्‍या पंचतारांकित उपाहारगृहावर मुंबई महापौरांची धाड !

‘द ललित’ या पंचतारांकित उपाहारगृहात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या वेळी लसीकरणाच्या नियमांचे पालन होत नसल्याने महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन !

मुंबईतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांच्या चाचणीचे ३१ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवली येथील आकुर्ली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात.