राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये दिव्यांग (विकलांग) मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत ! – आमदारांचा गंभीर आरोप

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना दिव्यांगांना (विकलांगांना) साधी स्वच्छतागृहेही उपलब्ध न होणे हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘एखादा मुसलमान कार्यकर्ता असला की त्याला ‘दाऊदचा साथीदार’ म्हटले जाते !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेली २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्या वेळी हे सर्व दिसले नाही. एखादा मुसलमान कार्यकर्ता असला की, त्याला ‘दाऊदचा साथीदार’ म्हटले जाते.

पोलीसदलावरील राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीला नेणारा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे.

धान्याचा अपहार करणार्‍या रास्त भाव दुकानाचे अनुज्ञप्तीपत्र (परवानापत्र) रहित करणार ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

स्वस्त धान्याचा काळाबाजार करून गरिबांच्या तोंडचा घास लुबाडणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीची समयमर्यादा वाढवण्यास सरकारचा नकार

शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी शिल्लक असल्याने खरेदीचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात केली.

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ आस्थापनाची पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

सांगली जिल्ह्यातील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ या आस्थापनातून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ यांमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषण होत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पुत्र नितेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदार आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ४ मार्च या दिवशी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

‘जुते मारो सालोंको’ या शब्दांवर आमदार कपिल पाटील यांनी घेतला आक्षेप !

अशा प्रकरची घोषणा सभागृहाची प्रतिमा मलीन करणारी असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘सभागृहाच्या कामकाजातून ही घोषणा काढून टाकण्यात येईल’, असे सांगितले.

कोकणातील सुधागड, रसाळगड, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, तर मुंबईतील ६ गडांचे संवर्धन होणार ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

भाजपच्या आमदारांनी उपस्थित केलेला गडांच्या सवंर्धनाविषयीचा तारांकित प्रश्न विधान परिषदेत प्रश्नांमध्ये उपस्थित करण्यात आला होता.