
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीसदल अत्यंत दबावाखाली आहे. भाजपचे सरकार असतांना महाराष्ट्राचे पोलीसदल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते; मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीसदल अत्यंत दबावाखाली आहे. अशा प्रकारचा राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ४ मार्च या दिवशी डोंबिवली येथील एका कार्यक्रमात केली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही, तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन. पोलीस ठाण्याला घेराव घालीन.’’
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !