मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेच्या सभागृहात विरोधकांनी दिलेल्या ‘जुते मारो सालोंको’ या शब्दांवर लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी ४ मार्च या दिवशी आक्षेप घेतला. अशा प्रकरची घोषणा सभागृहाची प्रतिमा मलीन करणारी असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘सभागृहाच्या कामकाजातून ही घोषणा काढून टाकण्यात येईल’, असे सांगितले. नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी ३ मार्च या दिवशी विधान परिषदेत ‘देश के गद्दारोंको, जुते मारो सालोंको’, अशी घोषणा दिली होती. ४ मार्च या दिवशीही इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयी घोषणा देतांना विरोधकांनी ‘जुते मारो सालोंको’ या घोषणेचा उल्लेख केला होता.