दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…

अंबरनाथच्या मोरिवली भागात रासायनिक आस्थापनातून वायूगळती

अंबरनाथच्या मोरिवली औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.) रासायनिक आस्थापनातून १२ सप्टेंबरच्या रात्री वायूगळती झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला

मुंबई उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचा आदेश

अधिवक्ता खुश खंडलेवाल कनिष्ठ न्यायालयात गेले, तेव्हा आव्हाड यांचे हे वक्तव्य एक अपराध असल्याचे मान्य केले होते; मात्र क्षेत्राधिकाराच्या आधारावर न्यायालयाने फौजदारी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता.     

नवी मुंबईत अनधिकृत विज्ञापन फलकांच्या प्रकरणी आयुक्तांचा मुळावर घाव !

नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रथम नामांकित असून शहर स्वच्छ आणि सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेचे दायित्व आहे. या फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला हानी पोचत आहेत.

माझगाव (मुंबई) येथील ‘एंजॉय ग्रुप’ने गणेशोत्सवात साकारला ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा !

माझगावमधील अंजीरवाडी येथील ‘एंजॉय ग्रुप’ या तरुणांच्या समूहाने एकत्रित येत या वर्षी गणेशोत्सव मंडळात ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा सादर केला आहे.

विधी आणि न्‍याय विभागाच्‍या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे ८ महिन्‍यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांचे रुग्‍णांसाठी अर्थसाहाय्‍य !

या कक्षाद्वारे मागील ८ महिन्‍यांमध्‍ये विविध गंभीर आजारांवरील  शस्‍त्रक्रियांचा समावेश आहे. त्‍यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब नागरिकांनी घ्‍यावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

RBI Imposes Penalties On Banks : एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना २ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड !

नियमांचे उल्लंघन केल्‍याच्‍या प्रकरणी आर्.बी.आय.ने एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या बँकांना दंड ठोठावला. एच्.डी.एफ्.सी. आणि अ‍ॅक्‍सिस या दोन्‍ही बँका खासगी क्षेत्रातील मोठ्या बँका आहेत.

मुंबईतील लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

निकाल बाजूने देण्यासाठी अनुवादकाने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करतो, हा प्रकार संशयास्पद आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेतील आणखी कुणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हावे !

विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाचा वाढीव भत्ता सरकारने नाकारला !

विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या गृहरक्षक दलाकडून गृह विभागाकडे मागणी करण्यात आली होती. याविषयी गृहरक्षक दलाच्या महासंचालकांकडून गृहविभागाला पत्र पाठवले आहे; मात्र विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाच्या भत्त्यात वाढ करण्यास गृहविभागाने नकार दिला आहे.

ऑक्टो रिक्शा आणि टॅक्सी मंडळासाठी सरकारकडून ५० कोटीचे अनुदान !

राज्यशासनाने नुकत्याच स्थापन केलेल्या धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्शा आणि मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले आहे.