माझगाव (मुंबई) येथील ‘एंजॉय ग्रुप’ने गणेशोत्सवात साकारला ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा !

‘एंजॉय ग्रुप’ या गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती

मुंबई – माझगावमधील अंजीरवाडी येथील ‘एंजॉय ग्रुप’ या तरुणांच्या समूहाने एकत्रित येत या वर्षी गणेशोत्सव मंडळात ‘श्रीकृष्ण गाथे’चा देखावा सादर केला आहे. या गाथेच्या देखाव्यातून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे स्वरूप यात दाखवण्यात आले आहे.

येथील नवीन विश्वकर्मा यांनी चालू केलेल्या या गणेशोत्सवाच्या कार्यात नंतरच्या नव्या पिढीतील युवकांनी सहभागी होत कार्यभाग सांभाळला. या सेवेत महाविद्यालयीन युवक प्रतिवर्षी सहभागी होतात. धार्मिक आणि हिंदु परंपरेला साजेसे देखावे सिद्ध करून मंडळाच्या वतीने समाजात चांगला संदेश दिला जातो.