पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !

 बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्‍या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.

अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी,  राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.

छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !

खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !

अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्रीरामाचे दर्शन घेण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्‍येला जाणार !

श्रीरामाने जीवनभर सत्‍य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी संदेशात म्‍हटले आहे.

१ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होण्‍याची शक्‍यता

वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्‍या राज्‍यस्‍तरीय समन्‍वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्‍तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र दंड वसूल

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र ९८४ रुपये दंड वसूल करण्‍यात आल्‍याची माहिती एन्.एम्.एम्.टी.चे व्‍यवस्‍थापक तथा उपायुक्‍त योगेश कडूसकर यांनी दिली.

नवी मुंबईत श्री रामनवमी उत्‍सव उत्‍साहात साजरा !

नवी मुंबईत ठिकठिकाणी श्री रामनवमी उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. तुर्भे गाव येथील संत श्री रामतनुमाता मंदिर येथे विश्‍वनाथ कृष्‍णाजी सामंत ट्रस्‍टच्‍या वतीने श्री रामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात आला.