अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला !

अमृता फडणवीस

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अनिल जयसिंघानी याने अमृता फडणवीस यांना धमकी देत खंडणी मागितली होती. याच प्रकरणात अनिल याचा चुलतभाऊ निर्मल जयसिंघानी याला ३० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत करण्यात आला आहे.