एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक मतप्रवाह निर्माण करत आहेत.

राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे बेमुदत कामबंद आंदोलन !

राज्यभरातील २ सहस्र २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

वारंवार मिळणार्‍या पुढच्या दिनांकांमुळे त्रस्त आरोपीने न्यायाधिशांच्या दिशेने भिरकवली चप्पल !

आरोपीचे कृत्य दंडनीय आहे. त्यासह यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली निघण्यासाठीही सरकारने ठोस उपयायोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

मुंबईत दुचाकीवर धोकादायक ‘स्टंट’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करून त्यांचा वाहन परवाना कायमचा जप्त करायला हवा ! तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

अमेरिकेतील अभिनेत्रीचे चुंबन घेतल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवन याच्यावर टीका !

नीतीमत्तेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आणि असे कृत्य करून भारताची मान खाली घालायला लावणार्‍या अशा कलाकारांच्या चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !

ठाणे येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत अपप्रकार करणार्‍या परीक्षार्थीला अटक

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! असे नकली परीक्षार्थी बसवून उत्तीर्ण होणारे पोलीस काय कामाचे ?

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !

 बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्‍या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.

अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्‍या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.