…तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – विधानसभा अध्‍यक्ष

सभागृह चालू असतांना जो प्रश्‍न सार्वजनिक हिताचा असेल असेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्‍य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात.

राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली जाणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही वृत्तपत्रांमध्ये राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीसभरती केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याविषयी गृहमंत्र्यांनी विधीमंडळात स्पष्टीकरण दिले.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

मुंबईत मॅनहोल्‍सवरील चोर्‍यांची स्‍थिती गंभीर, प्रतिवर्षी ६३२ मॅनहोल्‍सच्‍या झाकणांची होते चोरी !

मुंबईमध्‍ये प्रत्‍येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्‍सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्‍सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्‍यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्‍नांवर लिखीत स्‍वरूपात दिली आहे.

राज्‍यातील माध्‍यान्‍ह भोजन योजनेच्‍या घोटाळ्‍यांच्‍या आरोपांचे कामगार आयुक्‍तांकडून अन्‍वेषण होणार ! – डॉ. सुरेश खाडे, कामगारमंत्री

जिल्‍हा स्‍तरावर कामगारांना जी घरे दिली जातात किंवा इतर योजनेच्‍या अंतर्गत सोयी पुरवल्‍या जातात, त्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांची समिती नेमली जाईल आणि त्‍याची कार्यवाही व्‍यवस्‍थित होत आहे का ? याकडे ही समिती लक्ष ठेवणार आहे.

शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड !

ज्‍येष्‍ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्‍मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत.

मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले.

अंधेरी (मुंबई) येथे दरड कोसळली

अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर २४ जुलैला मध्‍यरात्री दीड वाजता दरड कोसळली. ‘रामबाग’ या ७ मजली इमारतीच्‍या मागच्‍या बाजूला असलेल्‍या डोंगरावरील माती वेगाने खाली सरकू लागली.

 जावेद अख्‍तर यांना समन्‍स

हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्‍तर यांच्‍याविरोधात अभिनेत्री कंगना राणावत यांना धमकावणे आणि तिचा अपमान केल्‍याप्रकरणी महानगरदंडाधिकारी यांनी समन्‍स बजावून ५ ऑगस्‍ट या दिवशी न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश दिले.