मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

छत्रपती संभाीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना जुने पेपर दिल्याच्या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत चालू व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाईल.

मुंबईत गॅस्‍ट्रो आणि लेप्‍टो यांच्‍या रुग्‍णांत वाढ

जुलै मध्‍ये धुंवाधार आणि सतत पाऊस पडत असल्‍यामुळे मुंबईतील रुग्‍णसंख्‍येत वाढ झाली आहे. १ सहस्र २७४ गॅस्‍ट्रोचे, हिवतापाचे ४१५, तर लेप्‍टोचे २४९ रुग्‍ण आहेत.

मिठी नदीतील गाळ काढण्‍यासाठी विशेष अन्‍वेषण पथकाची नियुक्‍ती करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील १७ वर्षांपासून मिठी नदीच्‍या सौंदर्यीकरणासाठी १३०० कोटी रुपये व्‍यय करूनही नदी प्रदूषणापासून मुक्‍त झालेली नाही.

राज्‍यातील शिक्षकांची रिक्‍त पदे ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत भरण्‍यात येतील ! – शिक्षणमंत्री

केसरकर पुढे म्‍हणाले, ‘‘पवित्र प्रणालीपूर्वी पूर्वानुमती न घेता शिक्षकभरती केलेल्‍याची माहिती दिली जाईल. अधिकारी दोषी आढळल्‍यास कारवाई होईल.’’

अल्‍प होत असलेले वनक्षेत्र हे वन्‍य प्राण्‍यांच्‍या समस्‍येचे मूळ कारण ! – वनमंत्री

गाय, म्‍हैस, बैल आदींचा वन्‍य प्राण्‍यांच्‍या आक्रमणात मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणारे १० सहस्र रुपयांचे साहाय्‍य आता ७० सहस्र रुपयांपर्यंत करण्‍यात आले आहे.

लोकसेवकांच्‍या संरक्षणासाठीच्‍या भादंवि. ३५३ (अ) चा दुरुपयोग, विधेयकात पालट होणार !

लोकसेवकांच्‍या संरक्षणासाठी असलेल्‍या भारतीय दंड विधान ३५३ (अ) चा दुरुपयोग होत आहे. त्‍यामुळे याविषयी सुधारित विधेयक आणावे, अशी मागणी २६ जुलै या दिवशी विविध पक्षाच्‍या आमदारांनी विधानसभेत केली.

राज्‍यातील सर्व पॅथॉलॉजी लॅब नोंदणीविषयी धोरण ठरवण्‍यासाठी समिती नियुक्‍त करणार ! – तानाजी सावंत, आरोग्‍यमंत्री

सद्य:स्‍थितीत पॅथॉलॉजी लॅब नोंदणीचा कोणताही कायदा राज्‍यामध्‍ये लागू नाही. त्‍यामुळे प्रयोगशाळांची नोंदणी राज्‍यातील कोणत्‍याही आस्‍थापनेमध्‍ये होत नाही.

आझाद मैदानावर आंदोलकांसाठी निवारा उभारण्‍याचे निर्देश !

आझाद मैदानावर आंदोलन करण्‍यासाठी राज्‍यभरातून आलेले आंदोलक भर पावसांत आंदोलन करतात; मात्र त्‍यांना निवारा नसल्‍याचे सांगितले. त्‍यावर अध्‍यक्षांनी वरील निर्देश दिले.