मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार इत्यादींनी शिवशंकर पाटील यांचे केवळ शाब्दिक कौतुक न करता त्यांचे अनुकरण करणे अपेक्षित आहे !

‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४.८.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहतांना ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे’, असे म्हटले.

राज्यसभेत गोंधळ घालणारे तृणमूल काँगेसचे ६ खासदार निलंबन

राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले.

गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया !

हे चित्र भारतातील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद ! गदारोळ घालणार्‍या खासदारांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रहित करून जनतेच्या पैशांची झालेली हानी त्यांच्याकडून वसूल करा, तरच अन्य बेशिस्त खासदारांवर वचक बसेल !

केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ शोभा करंदलाजे यांनी सर्व ट्वीट्स केल्या ‘डिलीट’ !

करंदलाजे यांनी आता कृतीतून त्यांची हिंदुत्वाप्रतीची निष्ठा प्रकट करावी, अशी हिंदूंची अपेक्षा !

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार; ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला.  एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे.

मराठा आरक्षणाप्रकरणी केंद्राची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे’, हा ५ सदस्यीय घटनापिठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ जुलै या दिवशी पुन्हा अधोरेखित केला.

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.

बिहारमध्ये चिराग पासवान यांच्याविरुद्ध लोकजनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांचे बंड !

भारतीय राजकारणातील तत्त्वहीनता ! पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे लोकप्रतिनिधी कधी जनतेशी एकनिष्ठ रहातील का ?

मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे.