हिंदुद्वेषी विधान केल्यावरून द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात बंदचे आवाहन

(द्रमुक : द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ)

नीलगिरी (तमिळनाडू) – तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा यांनी हिंदूंच्या केलेल्या द्वेषपूर्ण विधानाच्या विरोधात हिंदु मुन्नानी संघटनेने येथे बंदचे आवाहन केले होते. तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करून ए. राजा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून ए. राजा यांचे त्यागपत्र घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलतांना हिंदूंची तुलना वेश्यांशी केली होती. (ए. राजा सत्ताधारी पक्षाने खासदार असल्याने आणि त्यांनी हिंदुद्वेषी विधान केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात त्यांनी विधान केले असते, तर कारवाई झाली असती, हेच स्पष्ट होते ! – संपादक)