काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पोस्ट केले भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र !

टीका झाल्यावर पोस्ट हटवली !

डावीकडे भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र

नवी देहली – काँग्रेसचे खासदार आणि पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशि थरूर यांनी त्यांचे घोषणापत्र ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर भारताच्या मानचित्रातून (नकाशातून) काश्मीर आणि लडाख यांचा काही भाग गायब होता. यावरून त्याच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी ही पोस्ट हटवली आहे. ३ वर्षांपूर्वी थरूर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात केलेल्या पोस्टमध्येही अशाच प्रकारचे चुकीचे मानचित्र होते.

संपादकीय भूमिका

ज्या काँग्रेसमुळे काश्मीरचा काही भाग पाकला गिळंकृत करता आला, त्या काँग्रेसच्या नेत्याकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्याची मागणी झाली पाहिजे !