गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी सहभागी नसल्‍याची ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मांडली भूमिका !

‘बीबीसी न्यूज’कडून पंतप्रधान मोदी यांचा द्वेष करणार्‍या मालिकेची निर्मिती !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (ब्रिटन) – ‘बीबीसी न्‍यूज’ या वृत्तवाहिनीने बनवलेल्‍या २ भागांच्‍या मालिकेमध्‍ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुसलमानद्वेषी दाखवण्‍याचा प्रयत्न केला. यावर भारत सरकारने ‘ही मालिका अपप्रचाराचाच एक भाग आहे’, असे सांगत टीका केली. पाकिस्‍तानी वंशाच्‍या ब्रिटीश खासदाराने पाकिस्‍तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी ‘पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्‍यमंत्री असतांना वर्ष २००२च्‍या दंगलींमध्‍ये सहभागी होते’, असा दावा करत ‘पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याविषयी भूमिका मांडावी’, अशी मागणी केली. त्‍या वेळी ‘हुसेन यांच्‍या भूमिकेशी मी असहमत आहे’, असे सुनक यांनी सांगितले.

सौजन्य देशगुजराथएचडी 

१. खासदार हुसेन म्‍हणाले की, ब्रिटनच्‍या परराष्‍ट्र विभागाच्‍या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ष २००२ मधील गुजरात दंगलींमुळे झालेल्‍या हिंसाचारासाठी थेट उत्तरदायी होते. भारतासह जगभरातील अनेक कुटुंबे दंगलीमुळे आजही मानसिक त्रास सहन करत आहेत. अनेकांना अजूनही न्‍याय मिळालेला नाही. पंतप्रधान (ऋषी सुनक) आपल्‍या परराष्‍ट्र विभागाच्‍या या भूमिकेशी सहमत आहेत का ?, असा प्रश्‍न हुसेन यांनी उपस्‍थित केला.

२. हुसेन यांच्‍या प्रश्‍नावर ऋषी सुनक यांनी उत्तर देतांना म्‍हटले की, यासंदर्भात ब्रिटीश सरकारची भूमिका कायम आहे. तिच्‍यात अजिबात पालट झालेला नाही. अर्थात् आम्‍ही कोणत्‍याही प्रकारच्‍या हिंसाचाराचे कुठेही समर्थन करत नाही; पण इम्रान हुसेन यांनी मांडलेल्‍या भूमिकेशी मी असहमत आहे.

संपादकीय भूमिका 

  • पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान खासदाराला काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा वंशसंहार केला, ते दिसत नाही, हे लक्षात घ्या !
  • पाकिस्‍तानी वंशाचे लोकप्रतिनिधी जगात कुठेही गेल्‍यावर भारत आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून पाकचे हित साधण्‍याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्‍या !