इराणमधील मुल्ला, पाकिस्तानातील इमाम आणि सौदी अरेबियातील शेख यांना स्वर्गात पाठवा ! – गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम्स (नेदरलँड्स ) – इराणमधील मुल्ला (मुसलमान शिक्षक), पाकिस्तानातील इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि सौदी अरेबियातील शेख (अरबी सत्ताधीश) हे तेथील महिला आणि निष्पाप नागरिक यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना कारागृहात टाकतात, दहशत माजवतात आणि त्यांच्या हत्या करतात. अशा वेड्यांना स्वर्गात पाठवले पाहिजे, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ या पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले.