तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

लोकसभेत भाजपच्या खासदाराविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण

डावीकडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि भाजपचे खासदार रमेश बिघुडी

नवी देहली – लोकसभेमध्ये भाजपचे खासदार रमेश बिघुडी यांना उद्देशून अपशब्द वापरणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या अपशब्दाविषयी क्षमा मागण्यास नकार दिला आहे. त्यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचा उल्लेख करून म्हटले की, जर त्यांना क्षमा मागणे ऐकायचे असेल, तर त्यांना पुष्कळ वाट पहावी लागेल. मी क्षमा मागण्यापूर्वी भाजपच्या खासदाराने माझी क्षमा मागितली पाहिजे.

संपादकीय भूमिका 

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !