नागपूर येथील ‘आर्.टी.ई.’ घोटाळ्यात २ पालकांना अटक !

आर्.टी.ई. घोटाळ्याचे अन्वेषण करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने २ दिवसांपासून धाडसत्र चालू केले होते. पथकाने या प्रकरणातील मुख्य शाहिद शरीफ याने उघडलेल्या समांतर खासगी आर्.टी.ई. कार्यालयावर धाड घातली होती.

पुरणगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील अवैध उत्खनन प्रकरणी ग्रामस्थांनी काम बंद पाडले !

तहसीलदार सुनील सावंत यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाळू घाटात कंत्राटदाराने किती वाळूचा उपसा केला, याची पडताळणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी दुपारी नदीपात्र सोडले.

इतकी वर्षे आयकर खाते झोपले होते कि भ्रष्टाचारी होते ?

आगरा येथे आयकर विभागाकडून ‘फूटवेअर’ च्या दुकानावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Goa Temples Oppose NightClub Culture : ‘नाईट क्लब’ला विविध देवस्थान समित्यांचाही विरोध !

आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. अनैतिक प्रकारांना विरोध करणार्‍या देवस्थान समित्यांचे अभिनंदन !

‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !

दिग्गज स्मार्टफोनचे ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो यांविषयी एक खुलासा झाला आहे, ज्यात ‘की बोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ (अधिकोषाच्या संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया) आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरले जात आहेत.

नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांची नव्याने चौकशी करण्याचे राज्यपालांचे आदेश !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे बहुचर्चित कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी पुन्हा चौकशी चालू करण्यात आली आहे.

मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

Complaints Election Malpractices : निवडणुकीतील अपप्रकारांविरोधात ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर तक्रार नोंदवता येणार !

निवडणुकीतील व्यय, अपप्रकार, सदोष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, यांविषयी, तसेच मतदार नोंदणी, मतदान केंद्र आदींविषयी ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पोर्टल उपलब्ध आहे.

Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !