विद्यार्थी संघटनांनी अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची व्यवस्था करण्याची केली मागणी
म्हापसा : आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयामधील प्रथम वर्षातील एकूण ८८ विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या नियमानुसार वर्गात ७५ टक्के उपस्थिती नसल्याने परीक्षेला बसण्याची अनुमती नाकारण्यात आली. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी महाविद्यालयाने त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ‘एन्.एस्.यु.आय.’ या विद्यार्थी संघटनेने केली आहे.
(सौजन्य : OHeraldo Goa)
विद्यार्थी, पालक, ‘एन्.एस्.यु.आय.’ आणि अभाविप या विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांनी १८ एप्रिल या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे समस्या मांडली. प्रा. डॉ. आरोलकर यांच्या मते गोवा विद्यापिठाच्या नियमावलीनुसार वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे आणि अनुपस्थित राहिल्यास त्यासंबंधी स्पष्टीकरण किंवा आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प होती, त्यांना वेळोवेळी संपर्क साधून त्याविषयी माहिती देण्यात आली होती; मात्र विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
संपादकीय भूमिका
|