मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन वाझे यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू आहे. जे चुकीचे काम किंवा पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी सहकार्य करू.
शरजील उस्मानी यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविचे ‘२९५ अ’ हे विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे कलम पद्धतशीरपणे वगळण्यात आले.
येथील पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एन्.आय.ए.ने अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महाआघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा बनावट असून यात केवळ आकड्यांची हेराफेरी करण्यात आली आहे. हा जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी १२ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
अद्यापही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण ‘ती जाऊ नये’, असे वाटत असेल, तर कोरोनाविषयक बंधने पाळणे आवश्यक आहे. येत्या दिवसांमध्ये राज्यातील काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळामुळे जनतेच्या पैशांतून चालणार्या सभागृहाचा वेळ वाया घालवणे कितपत योग्य ? अशांकडून जनहितार्थ कार्याची अपेक्षा कशी करता येईल ?
महत्त्वाच्या सूत्रावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपनेच या सूत्रावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
चौकशी समितीनेही तसाच खोटा अहवाल सिद्ध केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करून २ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम वसूल करावी.
शासनाने मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करण्याचा निश्चिय केला आहे, असे निवेदन उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.