सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !
चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.