‘ईव्हीएम्’ यंत्राशी छेडछाडीचे जुने व्हिडिओ प्रसारित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न !

मतदानप्रक्रिया बाधित करण्यात येत असल्याचे आणि ‘ईव्हीएम्’ यंत्राशी छेडछाड करण्यात येत असल्याचे राज्याबाहेरील जुने व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून या दिवशी मतदान होणार !

लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून या दिवशी होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक अन् मुंबई शिक्षक मतदार संघ येथे ही निवडणूक होणार आहे.

पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता

गोव्यात ७ मे या दिवशी झालेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. या वेळी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या काही गोमंतकियांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vote Jihad : मधुबनी (बिहार) येथे बनावट मतदान करतांना पकडलेल्या ४ मुसलमानांना जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण करून सोडवले !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !

BJP To Get 300 Seats : भाजपला ३०० हून अधिक जागा मिळतील !

भारतातील सार्वत्रिक निवडणुका स्थिर वातावरणात चालू आहेत, अन्यथा जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला.

लोकशाहीच्या उत्सवातील गोंधळ ! 

पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सरकारसह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यंदा बराच घाम गाळला. परंतु उन्हाच्या झळा आणि त्यात शासनाचा भोंगळ कारभार यांमुळे अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला.

४ जूनला मतमोजणीच्या दिवशी दारूची दुकाने बंद !

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघांत मतदानच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते.

मुंबईत मतदानाची टक्केवारी न्यून होण्यामागे मोठे षड्यंत्र !

मुंबईत मतदानाच्या दिवशी पुष्कळ दिरंगाई झाली. मतदान प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात आली होती. परिणामी मतदानाचा टक्का घसरला, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या प्रचारसभेतील गोंधळामुळे पोलिसांकडून लाठीमार

येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते.

ठाणे येथे १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत नसल्याचा आरोप !

कल्याण येथे ८० सहस्रांहून अधिक नावे मतदारसूचीत नसल्याचे आढळून आले.  मतदारांकडे मतदानपत्र होते; मात्र मतदारसूचीत नाव नव्हते, असा सावळा गोंधळ होता.