
आझमगड (उत्तरप्रदेश) – येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते. सभेतच दगडफेक आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. या गोंधळात अनेक जण घायाळ झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. (बेशिस्त कार्यकर्ते असणारा पक्ष सत्तेत आल्यावर जनतेला कधीतरी शिस्त लावू शकेल का ? – संपादक) यादव व्यासपिठावर पोचले, तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अडथळे (बॅरिकेड्स) तोडून यादव यांच्या दिशेने धाव घेतली. या वेळी कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी