Vote Jihad : मधुबनी (बिहार) येथे बनावट मतदान करतांना पकडलेल्या ४ मुसलमानांना जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण करून सोडवले !

  • बनावट मतदान करणार्‍यांमध्ये ३ महिला !

  • बुरखा घालून करत होते मतदान !

मुसलमानांचे पोलीस ठाण्यावरील आक्रमण

मधुबनी (बिहार) – येथे २० मे या दिवशी लोकसभेच्या जागेसाठी मतदान झाले. तेव्हा बनावट मतदान करतांना सनाउल्ला या पुरुषासह सादिया शेख, सालेहा फातिमा आणि झीनत परवीन या महिलांना पकडण्यात आले. यानंतर रात्री १५० हून अधिक मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.

१. येथील हक्कनिया मदरसा देवरा बंधौली या मतदान केंद्रावर या ४ जणांना बनावट मतदान करतांना पकडण्यात आले. या चौघांना जाले पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते, त्या वेळी स्थानिक लोकांनी तेथे गोंधळ घातला; मात्र पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले; मात्र नंतर रात्री १५० हून अधिक लोकांच्या जमावाने आक्रमण करून पकडलेल्या ४ जणांची सुटका केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

२. सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता शशांक शेखर झा यांनी या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करत म्हटले आहे की, ‘धक्कादायक, महंमद सनाउल्लाह आणि ३ मुसलमान  महिला यांना दरभंगा, बिहार येथील हक्कानिया मदरसा मतदान केंद्रातून अटक करण्यात आली. का ? कारण ते बुरखा घालून बनावट मतदान करत होते. यानंतर १००-१५० मुसलमानांच्या जमावाने रात्री जाले पोलीस ठाण्यावर आक्रमण करून सर्व आरोपींची पोलीस ठाण्यातून सुटका केली.’

३. दरभंगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जगुनाथ रेड्डी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, आक्रमणाच्या प्रकरणात २४ जणांची नावे आहेत आणि १३० अज्ञात आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणाचा तपास आता दरभंगाच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष अन्वेषण पथक करत आहे.

संपादकीय भूमिका

  • यावरून ‘बिहारमध्ये जंगलराज अजूनही आहे का ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो ! पोलीस स्वतःचे रक्षण करू शकत नाही, हे त्यांना लज्जास्पद !
  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !