४ जूनला मतमोजणीच्या दिवशी दारूची दुकाने बंद !

  • दुकानमालकांकडून विरोधी याचिका प्रविष्ट !

  • २४ मे या दिवशी सुनावणी

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघांत मतदानच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते. ४ जून या दिवशी मतमोजणी होणार असून त्यादिवशीही दारूची दुकाने, वाईन शॉप आणि पब बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण या प्रकरणी दुकानमालकांनी न्यायालयात याविरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर २४ मे या दिवशी सुनावणी होईल.