मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शिवसेनेच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेनेच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालून अभिषेक करण्यात आला.

कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

कोल्हापुरात १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सर्व स्वामीभक्तांनी या अमृतमय सोहळ्याचा लाभ घेऊन स्वत:च्या जीवनात नवचैतन्य फुलवावे’, असे आवाहन सोहळ्याच्या आयोजकांनी केले आहे.

‘एस्.टी.’च्या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट !

प्रादेशिक परिवहन विभागाची डोळेझाक !, सांगली-कोल्हापूर २०० रुपये, तर कोल्हापूर-पुणे १ सहस्र रुपयांची आकारणी

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका ! – मेधा पाटकर

विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.

दोषारोप निश्चिती करतांना प्रकरणातील सर्व संशयितांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करावे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.

कार्तिक मासात श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य शिखरावर लावण्यात येणारा वैशिष्ट्यपूर्ण असा ‘काकडा’ !

कार्तिक मासात दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरातील नित्योपचारात पालट होतो. या कालावधीत मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वांत उंचावर कापूर लावतात, त्यास ‘काकडा’ म्हणतात.

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

विविध मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप आणि कारवाईचे प्रकरण

कोल्हापूर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध !

शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.