कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

डावीकडून श्री. कुलदीप जाधव, श्री. अमोल कोरे, श्री. रमेश चावरे, श्री. सुहास पाटील, श्री. दीपक कचरे आणि  सौ. सीमा मकोटे

कोल्हापूर, १२ नोव्हेंबर – कोल्हापुरात १४ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शिवाजी पुलाशेजारी, आंबेवाडी-कोल्हापूर येथील ‘दत्त समर्थ सांस्कृतिक भवन’ येथे होईल. या सोहळ्याला २ सहस्र भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून १५ ते १७ लाख जप अपेक्षित धरला आहे. ‘सर्व स्वामीभक्तांनी या अमृतमय सोहळ्याचा लाभ घेऊन स्वत:च्या जीवनात नवचैतन्य फुलवावे’, असे आवाहन सोहळ्याचे आयोजक श्री. दीपक कचरे, श्री. रमेश चावरे, अध्यक्ष श्री. अमोल कोरे, कार्याध्यक्ष श्री. सुहास पाटील, श्री. कुलदीप जाधव आणि सौ. सीमा राजेंद्र मकोटे यांनी केले आहे.

कोल्हापूर-अक्कलकोट पदयात्रेचे आयोजन

दत्तजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर-अक्कलकोट पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही पदयात्रा ८ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथून प्रस्थान करेल. ११ दिवस चालणार्‍या या पदयात्रेत सहभागी भक्तांना दोन वेळेचा महाप्रसाद (भोजन), चहा-अल्पहार यांची व्यवस्था, तसेच त्यांची निवास व्यवस्था विनामूल्य करण्यात येणार आहे. ज्या भक्तांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड येथे अथवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक – श्री. सुहास पाटील ९८९०४८९७१७, श्री. अमोल कोरे ९४२०००९०९०,  श्री. रमेश चावरे ९७६३९७८००८